आरोग्य सहाय्यक कांचन तायडे सेवानिवृत्त 

 कुंडलवाडी (अमरनाथ कांबळे )
         बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कांचन रामराव तायडे हे वयोमानानुसार दिनांक 31 मे रोजी 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत,त्यांची प्रथम नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र बाराळी ता. मखेड येथे झाली होती तेथे त्यांनी 1985 ते 1989,प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी ता बिलोली 1989 ते 2012, प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम ता नायगाव 2012 ते 2014, प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी ता बिलोली 2014 ते 2023,आदी कार्यरत होत्या कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते तब्बल 22 वर्ष अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने गोरगरीब रुग्णाची सेवा केले,त्यामुळे त्यांचा हा कार्यकाळ येथील नागरिकांच्या हृदयात आजतागायतही कायम स्मरणात आहे.

          त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन देवराय,डॉ श्रीनिवास मोरे, डॉ प्रतीक्षा पवार, डॉ बालाजी सातमवाड, डॉ विनोद माहुरे,डॉ मंजुषा सावंत,डॉ आरती गणगुरडे, डॉ नरेश बोधनकर, आरोग्य सेवक सुभाष पवार, संभाजी पवार, राजेश बेटेराज, अरुण गादगे,गंगाधर रत्नागिरे,आर.पी.तुमोड,दताहरी कदम,आदीसह सर्व आरोग्य कर्मचारी,नातेवाईक,मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत……

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या