आदर्श मार्गदर्शनाची सांगता म्हणजे मा.प्राचार्य प्रभाकर मोरे सर यांची सेवानिवृत्ती ! 

[ रायगड म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
जीवन म्हणजे पाठशिवणीचा खेळ आहे आयुष्याच्या या प्रवासात असंख्य माणसे भेटत राहतात त्यातील काही मनाच्या तिजोरीत कायम जपून ठेवली जातात तर काही मनाचा तळ हालवून आयुष्यभर स्मरणात राहतात. त्या पैकी एक म्हणजे स्वामी शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कुल व जु.कॉलेज म्हसळा जि.रायगड या विद्यालयाचे माझे मार्गदर्शक आणि माझ्यासारख्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे म्हणले तर वावगे ठरणार नाही ते म्हणजे आदरणीय मा. प्राचार्य श्री प्रभाकर जयराम मोरे सर.

माझ्या सारख्या एका सामान्य आदिवासी भागातून आलेल्या नवतरुण प्राध्यापका वर पूर्णपणे विश्वास ठेवणारे चंदनासारखा नेहमी दुसऱ्याला आनंद देणारे कल्पक बुद्धिमता कर्तव्यनिष्ठा, नम्रता जिद्ध या गुणांच्या आधारे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आमचे गुरुवर्य आज एक टप्पा पारकरून प्रदीर्घ अध्यापनाच्या कामकाजातून आज सेवानिवृत होत आहे तेंव्हा माझ्या मनात माजलेला काहूर हा कुणाला सांगण्यासारखा नाही
आपल्या सावली पासून आपणच शिकावे, कधी लहान होऊन तरी कधी मोठे होऊन जगावे, शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयात जपावे.
सरांच्या बरोबर असणारे माझे नाते असेच आहे त्यांच्या दिड वर्षाच्या छोट्याश्या सहवासात अनेक गोष्टी मला उमगल्या व शिकत्या आल्या सरानी या कालावधीत आमच्या विद्यालयाचा कायापालट करून दाखविला हे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक, संस्थेचे पदाधिकारी व शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी सरांचे असणारे नाते हे अतुलनीय असेच होते.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या देत असताना असे वाटते की,
चैत्यनाची फुलवा झाडे द्या जगण्याला अर्थ नवा.
सेवा जवळून व ज्ञान आतून, अशा आधाराचा हात हवा..
अशा आधाराचा हात हवा.
…………………………………….

                      शब्दांकन – प्रा.गूलाबसिंग सुका गावित

ताज्या बातम्या