पाटील जी.जी. यांच्या सेवा निवृत्ती निमित्त आज माचनूर येथे सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन !

( कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे )
कुंडलवाडी पासून जवळ अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचनुर केंद्र हुनगुंदा या शाळेचे मुख्याध्यापक जी. जी. पाटील हे आज दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोज बुधवारी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचनूर व ग्रामपंचायत कार्यालय माचनुर यांच्यावतीने सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार सुभाष साबणे तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. नांदेड चे माजी शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे, माजी जि .प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती बिलोली चे गटशिक्षणाधिकारी बालाजी पाटील तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वाय .एस. कौठकर, सौ .भैरवाड मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक एल .एल .रामपुरे सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सत्कार सोहळ्यास कुंडलवाडी, हुनगुंदा या केंद्रातील सर्व शिक्षक, अधिकारी ,पदाधिकारी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत कार्यालय माचनूर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचनूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या