माध्यमिक आश्रम शाळेतील प्राचार्य श्रीराम राठोड, शेख शादुला सेवापूर्तीच्या निमित्ताने सांस्कृतिक विभागाची जोरदार तयारी. 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
   तालुक्यातील गडगा केंद्रा अंतर्गत “बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित” माध्यमिक आश्रम शाळा मरवाळी तांडा येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री श्रीराम राठोड, हिंदी विषयाचे सहशिक्षक शेख शादुल्ला दि ३०/११/२०२२ रोज बुधवार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्या अनुषंगाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ज्यू. पोस्ट बेसिक ज्यू कॉलेज मधील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवा पूर्तीच्या निमित्ताने सापत्नि क सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 तालुक्यातील गडगा केंद्राअंतर्गत येणाऱ्या ” बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित”माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री श्रीराम राठोड, सहशिक्षक पदापासून संस्थेत ३८ वर्ष अविरतपणे अध्यापन केले आहे.त्यांच्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थी हे डॉक्टर, इंजिनिअर, तहसीलदार, शिक्षक या पदावर विराजमान झाले आहेत.
तर हिंदी या विषयातील तज्ज्ञ शिक्षक म्हणून ख्याती प्राप्त केलेले सहशिक्षक शेख शादुल्ला हे वयाची ३० वर्ष अध्यापनाचे अविरतपणे कार्य केले आहे. ता. ३०/११/२०२२ रोज बुधवारी नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त होत आहे त त्या अनुषंगाने प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक ज्यू कॉ. पोस्ट बेसीक आश्रम शाळेतील सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां च्या वतीने व शाळेतील आजी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थिती मध्ये हा शाळेतील भव्य प्रांगणात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 
याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने उद्याच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने सापत्निक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी मूला-मूली कडून सांस्कृ तिक कार्य क्रमांची जोरदार पणे तय्यारी केली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या