जनता हायस्कूलचे माजी प्राचार्य ह.स. खंडगावकर सर यांचे पुस्तक प्रकाशन व पर्यवेक्षक मधुकर सरगुले यांचा सेवानिवृत्त सोहळा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
जनता हायस्कूल नायगाव (बा )येथील पर्यवेक्षक मधुकर सिताराम सरगुले हे 34 वर्ष पाच महिने 25 दिवस एवढ्या प्रदिर्घ सेवेच्या कालावधीनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

त्या निमित्ताने त्यांचा जनता हायस्कूल येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यवेक्षक मधुकर सरगुले यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात येऊन संस्थेच्या वतीने त्यांचा सपत्नीक भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमाच्या वेळी जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ह. सं. खंडगावकर यांनी प्रकाशित केलेल्या कष्टाचे डोंगर व यशाची शिखरे या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.स खंडगावकर यांचा सपत्नीक सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
सेवापूर्तीच्या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. आ.वसंतरावजी पाटील चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. गोविंद नांदेडे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संस्थेचे सचिव प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, नायगाव नगरपंचायतच्या सभापती सौ.मीनाताई कल्याण नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, माजी उपप्राचार्य तथा जेष्ठ साहित्यिक प्रा.नारायण शिंदे , उपाध्यक्ष वसंत सा. मेडेवार, ज्येष्ठ संचालक केशवराव पाटील चव्हाण, माधवराव बेळगे, हनुमंतराव पा.चव्हाण संगमनाथराव कवटिकवार, माजी प्राचार्य ह. सं. खंडगावकर, माजी प्राचार्य तथा कोषाध्यक्ष गोविंदराव मेथे, जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.प्रभाकर पवार, पर्यवेक्षक गणेश देवडे, यशवंत चव्हाण, उप मुख्याध्यापक सा. रा. जाधव, पर्यवेक्षक मधुकर सरगुले यांचे नातेवाईक व माजी प्राचार्य हं.स. खंडगावकर यांचे नातेवाईक उपस्थित होते. तसेच जनता हायस्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीजनता हायस्कूल क.म.वि.चे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य मो. ज. चव्हाण यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवराचे आभार प्रा. पाटील सर यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या