हेंगीष्टे मॅडम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न !

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)

हेंगीष्टे मॅडम यांनी, निष्ठेने काम करून शिक्षण क्षेत्रात योगदान दिले आहे असे प्रतिपादन स्कुल कमेटीचे चेरमन समीर बनकर यांनी केले.न्यू इंग्लिश स्कुल कनिष्ठ महाविद्यालया मध्ये हेंगीष्टे मॅडम यांच्या सेवानिवृत्ती चा सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री समीर बनकर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दिलीपजी कांबळे होते.तर प्रमुख उपस्थति प्राचार्य प्रभाकर मोरे हे होते समीर बनकर म्हणाले, हेंगीष्टे मॅडम यांनी व्यक्तिगत जीवनातील सुखदु:खावर मातकरून आपले कर्तेव्य पार पाडले. माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे म्हणाले कि हेंगीष्टे मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवाकरून आदर्श पिढी निर्माण करण्याचे कार्य केलेले आहे.

प्राचार्य मोरे म्हणाले संस्थेच्या एकाच शाखेत बत्तीस वर्ष ज्ञानदानाचे पवित्रकाम केले आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेंगीष्टे मॅडम यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

जेष्ठ शिक्षक मंगेश कदम मुख्याधिपिका काकडे मॅडम स्कुल कमेटी सदस्या रेखा धारिया महेंद्र करडे, गणेश हेंगीष्टे दिपल शेरखे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत गाजरे, सौ कल्पना देवगावकर यांनी केले तर आभार नेताजी गायकवाड यांनी मांडला कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विदयार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या