कांग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रा. रविंद्र चव्हाण – निवृती कांबळे यांना विजयी करा तेलंगाना मुख्यमंत्री मा.रैवंत रेड्डी यांचे मतदारांना आवाहन.!

( बिलोली ता. प्रतिनिधी – सुनील जेठे )
९० देगलूर -बिलोली विधानसभा निवडणूकीमधील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण – निवृती कांबळे सांगविकर यांची प्रचार रॅली रोड शो दि.१७ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. या रॅलीत तेलंगाना मुख्यमंत्री मा.रैवंत रेड्डी यांचे कांग्रेस तालुका कमिटीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. रविंद्र चव्हाण – निवृती कांबळे सांगविकर यांना विजयी करा असे मतदारांना आवाहन मा.रैवंत रेड्डी यांच्याकडून करण्यात आले.

 कांग्रेस उमेदवारच्या या प्रचार रोड शो रॅलीत हजारोंच्या संख्येत लोक जमली होती. रॅली ही शांततेत व कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता संपन्न झाली. रॅलीसाठी बिलोली पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या प्रचार रोड शो रॅली मध्ये कांग्रेस तालुका कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव पा.पाचपिंपळीकर, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, संजय पा.बेळगे, वलिवोद्दीन फारुकी, केदार साळुंखे रामपूरे पाटील, शुभम जेठे, नितीन देशमुख, यांच्यासह मतदार नागरीक, महिला, युवा कार्यकर्ते  हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या