बोगस कामाचा कळस गाठला ; सार्वजनिक बांधकाम विभागचे हाताची घडी तोंडावर बोट !

             ● आठ महिन्यात खड्डेच खडे !!

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर ते सांगवी राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या मळ्या पर्यंत बोगस रस्त्याचं काम केल्या गेल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नायगाव तालुक्यातील कुंटूर ते सांगवी ह्या रस्त्याच्या (Road) डांबरीकरणाचे काम करून आठ महिने झाले आहे. प्रतिक कन्ट्रक्शन च्या वतीने डांबरीकरणाचे हे काम करण्यात आहे.
रोड
रोड
मात्र, हे डांबरीकरण ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. रोडवर खडी आणि डांबराचा इतका कमी थर टाकण्यात आलाय कि, हा रास्ता चक्क हाताने उखडून येत असल्याने संपूर्ण बोगस कामाची पोलखोल दिसत आहे.
सांगवी, मेळगाव, धंनज व हुस्सा, राहेर जोडण्यात येणारा रस्ता आहे. कुंटूर ला येजा करणरे नागरीकानी यांनी केलेली पाहाणी करुन एकमत प्रतिनिधी बोलताना सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर 5054(40) मार्ग पुल नांदेड जिल्ह्य़ातील नायगाव तालुक्यातील सोमठाना, सुगावा हिपरगा, कुंटूर, सांगवि, मेळगाव, राहेर आहे. रस्त्याचे चार महिन्या पूर्वी झालेल्या कामाची पाहणी केलेल्या ठिकाणी कामाची पाहणी करून हे काम कसे निकृष्ट दर्जाचे आहे. हे फोटो व्हिडिओच्या (video) माध्यमातून दाखवून दिले आहे.
नायगाव शासकीय बांधकाम कार्यालयात कोणतेही अधिकारी, अभियंता, कनिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती लागत असल्याचे दिसत नाही. सतत दौऱ्यावर असल्याचे सांगले जाते पण रस्त्यावर सुद्धा दिसत नाहीत आणि भ्रमणध्वनी तर नेहमीच नॉटरचेबल आणि कवरेज क्षेत्राच्या बाहेरच असल्याचे दिसून येते. यामुळे तालुक्यातील सा.बां अभियंता नावालाच दिसून येते.
शासनाच्या वतीने रस्ते विकास करण्यासाठी करोडो रुपये खर्च केला जात आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडले जाईल. लोकांना वाहतूक करणे शक्य होईल पण तालुक्यातील शासकीय अधिकारी व गुत्तेदार यांना शासनाच्या तिजोरी खुली करून देत आहेत आणि गुत्तेदार शासनाला दिवसा लुटत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून नायगाव तालुक्यातील अशक बोगस कामे करणाऱ्या गुत्तदाराचे परवाने रद्द करावेत अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या