विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओकडे पोलिसांचे दुर्लक्ष.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या नायगाव शहरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ व हेडगेवार चौक ते शेळगाव रोडवरील शाळा महाविद्यालय मार्गावर विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या सडक छाप रोडरोमियोंनी उच्छाद मांडला असुन त्यांच्या या उपद्रवला विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत. याकडे शाळा, महाविद्यालय, काॅलेज प्रशासन व पोलिसांचे स्पेशल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
नायगाव शेळगाव रोडवरील जनता हायस्कूल ज्युनियर कॉलेज, यमुनाबाई मुलीचे हायस्कूल,,टिवीशनला ये जा करताना मुख्य रोडवर हे सडक छाप रोड रोमियो उभे राहतात. येथे त्यांचे थांबे तयार झाले आहेत. शाळा कॉलेज,टिवीशन सुटल्यानंतर व शाळा भरायच्या अगोदर हे रोडरोमिओ महाविद्यालयातून घरी चाललेल्या विद्यार्थिनींची टू व्हीलर वर पाठलाग करत डबल सीट व ट्रिपल सीट सुसाट वेगाने येत विद्यार्थिनींची छेड काढत असल्याने मागील काही दिवसापूर्वी या शाळा कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना आपले शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. या रोडरोमियांचा वेळीच बंदोबस्त केला नसल्याने त्यांचे मनोधैर्य चांगलेच वाढत चालले आहे.
शिक्षण घेण्यासाठी नायगाव तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थिनी ये-जा करत असतात. या विद्यार्थिनींना रस्त्यावर अडवून छेड काढण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत याकडे शाळा, महाविद्यालय, काॅलेज प्रशासन व पोलिसांचे स्पेशल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून नाराजी व्यक्त होत आहे. काही विद्यार्थिनींनी या रोडरोमिओ यांची चांगलीच धास्ती घेतली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या