रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून अभियंत्याच्या तोंडाला फासले काळे !

(रायगड/म्हसळा-प्रा.अंगद कांबळे)
म्हसळा तालुक्यातील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी बांधकाम अभियंत्याच्या तोंडाला काळे फासले. या प्रकरणी अभियंता संजय डोंगरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून या मध्ये नंदू शिर्के आणि सोबतचे आठ जना विरुद्ध तक्रार दाखल केली असून यांच्यावर अट्रोसिटीअक्ट गुनाह दाखल झाला आहे.
सुमारे 10 लक्ष खर्च करून रस्ते विकास मजबुतीकरण कामा अंतर्गत भापट या म्हसळा तालुकयातील गावात रस्ता बनवण्यात आला होता पण तो रस्ता पावसाने दुसऱ्याच दिवशी वाहून गेला हे समजताच रस्त्याची पाहणी करून शिकसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के हे पंचायत समिती मध्ये गेले असता त्या ठिकाणी अभियंता संजय डोंगरे हे भेटले असता त्या ठिकाणी दोघांन मध्ये विचार पूस सुरु असताना अभियंता डोंगरे हे चुकीची माहिती देत आहे असे म्हणून जनतेचे पैसे आहेत ते जनतेच्या कल्याणासाठी वापर करा म्हणत अभियंता डोंगरे यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते श्री डोंगरे यांनी तातकाळ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद. नोंद केली असून आपण अनुसुचित जातीचे आहोत हे माहिती असून जाणीव पुर्वक अपमानित करण्यात आले आहे असे नमूद केले पोलिसांनी भा.द.वि जातीवाचक कायदया नुसार अट्रोसिटी लावण्यात आला आहे.

ताज्या बातम्या