पदवीधर निवडणुकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाला जागा दाखवून देणे गरजेचे – मा.आ.रोहिदास चव्हाण!

विशेष प्रतिनिधी /रियाज पठान

भाजपाला पदवीधर निवडणुकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांना पहिल्या पंसदीचे मतदान करुन विधानसभेवर पाठवण्याचे आवाहन शिवसेना ज्येष्ठ नेते, मा.आ.रोहिदास चव्हाण यांनी केले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ .लोहा येथील जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा येथे शिवसेनेचे जेष्ठ नेते मा.आ. रोहिदास चव्हाण याच्या अध्यक्षतेखाली प्रमुख उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवारआ.सतिश चव्हाण तर प्रमुख पाहुणे काँग्रेसचे नियोजन समिती सदस्य मा.सनदी अधिकारी अनिल मोरे उपस्थित होते.

प्रसंगी शिवसेना नेते मा.आ रोहिदास चव्हाण पुढे बोलताना म्हणाले,भाजपा सत्तेवीना तडपडत आहे,कुठे कोणती बाजु घ्यावी ?हे सुध्दा समजत नाही.फक्त विरोध करायचा म्हणुन सद्या चालु असलेल्या रिपब्लिक टि.व्हीचे अँकर अर्णव गोस्वामी या आरोपीने एका मराठी महिलेचे कुंकु पुसण्याचे पाप केले आहे आणि भाजपा वाले त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

या अशा पापी भाजपाला पदवीधर निवडणुकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे असून आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांना पहिल्या पंसदीचे मतदान करुन विधानसभेवर पाठवण्याचे आव्हान शिवसेना ज्येष्ठ नेते तथा मा.आ.रोहिदास चव्हाण यांनी केले.

-●●—●●—●●–●●-

◇●सामान्याच्या प्रश्नासह शिक्षक,विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना वाचा फोडली-आ.सतिश चव्हाण●◇

मागिल दोन्ही निवडुणुकीत मला लोहा-कंधार मतदार संघाने भरघोस मतानी विजयी केले.

गत निवडणुकीत निवडुन आल्यानंतर मी विधान परिषदेत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासह शिक्षक,विद्यार्थी ,रस्ते शेतकरी अशा अनेक प्रश्न मांडून ते सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणुन 1 नोव्हेंबर पासुन विना अनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकाना 40% प्रमाणे वेतन देण्यात येणार आहे तर कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन देण्याचा निर्णय  होईल आणी जुनी पेन्शन ही शासनाच्या कशी फायद्याची आहे हे सांगण्यात मी यशस्वी झालो आहे असे म्हणले, पुढे बोलताना भाजपा वाले मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी नवनवीन शकल लढवत औरंगाबाद पदवीधर मतदिर संघात 17 जन सतिश चव्हाण नावाच्या व्यक्ती उमेदवार म्हणुन तयार करण्याच्या तयारीत आहेत, तरी मतदारांनी गोधळुन न जाता मी शिवसेना,राष्ट्रीय काँग्रेस, व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचा उमेदवार असुन,प्रथम पंसदीचे मतदान देवून कुटील कारस्थानी भाजपाला आपली जागा दाखवून द्यावी.असे आवाहन औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतिश चव्हाण यांनी केले आहे.

-●●—–●●—-●●—●●-

प्रसंगी काँग्रेसचे पं.स.सदस्य श्रीनिवास मोरे,युवक काँग्रेसचे राहुल हंबर्डे,डि.बी.जाभुळकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पं.स.सदस्य नवनाथ उर्फ बापु चव्हाण,शेळके साहेब ,शेषराव कहाळेकर, यशवंत कांबळे,सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामकिशन पारेकर, मारोती पंढरे,संजय अकोले,विष्णु शिंदे,ज्ञानोबा शिंदे,बालाजी कपाळे,ढगे सर ,निरंजन वाघमारे नागनाथ पुरी,तिडकेसर,विनोद मस्के आदींसह बहुसंख्य उपस्थिती होती.

ताज्या बातम्या