मोहर्रम व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बिलोली शहरात पोलिस ठाणेच्या वतीने पथसंचलन (रुटमार्च)

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली येथे दि.३० जुलै रोजी पोलिस ठाणे च्या  वतीने पथसंचलन “रुटमार्च” रॕली पोलिस उपविभागीय अधिकारी मा.एन.एम.कसेकर यांच्या उपस्थिती मध्ये काढण्यात आली.

सदरिल शहर व तालुक्यात मोहरम व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी  करताना शांततेच, सुव्यवस्था, कायदयाच नवयुवक व नागरिकांनी पालन कराव आणि त्यांच्यावर कोनताही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शहरात पथसंचलन रुटमार्च रॕली  काढण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी मा.एन.एम.कसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलील निरिक्षक मा.अनंत नरुटे यांनी  शहरातील मुख्य रस्ता, गांधीचौक, जामा मज्जीद भागात पोलिस, सी.आर.पी.एफ, होमगार्ड जवानांचा ताफा घेऊन पथसंचलन रुटमार्च रॕलीच्या माध्यमातून जनतेला संदेश दिला.
यावेळी रुटमार्च रॕलीत डी.व्हाय.एस.पी.मा.एन.एम.कसेकर, पो.नि.मा.अनंत नरुटे, बिट जमादार सोनकांबळे यांच्यासह सी.आर.पी.एफ जवान, होमगार्ड जवान यांचा सहभाग होता.
 बिलोली शहरात दर वर्षी मुस्लिम मोहरम असो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो या दरम्यान सर्व धर्माचे युवक मिञ एकञ येऊन शांततेच्या वातावरणात जयंती साजरी करत  आलेत. त्याच पद्धतीने  यंदाही  बिलोली पोलिस ठाणेच्या वतीने कडक बंदोबस्त मध्ये जयंती, मोहरम सन साजरा करतील ? असे चिञ शहरात दिसुन येत आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या