रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कृषी बाजार समित्यांना माहिती अधिकार कायदा लागू.

[ अलिबाग प्रतिनिधि – अभिप्राव पाटील ]
माहिती अधिकार कायदा हा २००५ सालापासून संपूर्ण देशात लागू झाला तरी ही रायगड मधिल कृषी बाजार समित्या ह्या आम्हाला माहिती अधिकार कायदा लागु होत नाही असे प्रत्येक RTI कार्यकत्याला सांगुन माहिती देण्यास प्रत्येकवेळी टाळत असत. या बाबतच्या तक्रारी मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य श्री. देवव्रत विष्णू पाटील यांच्यांकडे आल्यानंतर देवव्रत पाटील यांनी याबाबत गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक डॉ. स्मिता गायकवाड मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार करत नागरीकान बद्दल असलेल्या अनास्थे बाबत तिव्र शब्दात खेद प्रकट केला आणि रायगड जिल्हातिल सर्व कृषी बाजार समित्यांमध्ये माहिती अधिकारी तसेच अपिलीय अधिकारयांच्या नेमणुका करण्यासंबधीचे आदेश काढण्याची मागणी केली.

 सदर बाबतीत डॉ. गायकवाड मॅडम यांनी सर्व तालुक्यातील कृषि बाजार समित्यांची चौकशी करून तसेच आयुक्त कार्यालय , पुणे येथुन माहिती घेऊन कृषी बाजार समित्यांमध्ये माहिती अधिकारी तसेच अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करण्यासंबंधीचे आदेश काढले.
देवव्रत पाटील यांच्या प्रयत्नाने यापुढे जिल्हयातील सर्व तालुक्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारांवरांची नागरीक पाहणी व कागदपत्रांची मागणी करू शकतात.

रायगड जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन :- जर कोणत्याही तालुक्यातील कृषी बाजार समीतीमध्ये नागरीकांना माहीती देण्यास नाकारल्यास वरील पत्राचा संदर्भ (दाखवुन) देऊ शकाल तरी सदर पत्र आपल्याकडे सेव करा.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या