प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अकरा गुटे जमिन दान ; 82 लाख रुपये शासनाकडून निधी मंजूर !
“इमारत बांधकाम पूर्णत्वास; मात्र आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. दान देणारे-किशनराव पाटील जगदंबे कारेगावकर यांची माहिती”.
[ कारेगाव फाटा :- आनंद सुर्यवंशी ]
कारेगाव ता.धर्माबाद हा मोठा चौरस्ता असुन या गावाला परिसरातील वीस गावांचा संबंध येते. या फाट्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याची अनेक दिवसाची मागणी होती ती मंजूर झाली पण जागा दान देण्यासाठी कोणीही पुढे येते नव्हते मात्र कारेगावचे दानशुर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन किसनराव पाटील जगदंबे कारेगावकर यांनी अकरा गुटे जमीन दान देवून अडचण दूर केली. आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रस्ताच नाही यामुळे इमारत होऊन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत उभी आहे.
कारेगाव फाटा येथे अनेक गावातील नागरिक आरोग्य सेवा घेण्यासाठी खाजगी दवाखाण्यात येत असतात. मात्र येथे तज्ञ डॉक्टर किंवा मोठे हॉस्पिटल नाही. आरोग्य सेवेसाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत होती. हि अडचण लक्षात घेवून कारेगाव व परिसरातील नागरीकांची प्रा. आरोग्य केंद्राची मागणी होती.
शासनाने मागणी मंजूर करुन 82 लाख रुपये निधी मंजूर केला आरोग्य केंद्र मंजूर झाले मात्र जमिन दान देण्यास कोणी तयार होईना. आरोग्य केंद्र बांधण्यास शासनाला अडचण झाली होती. अडचण सोडवण्यास कारेगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन किसनराव पाटील जगदंबे- कारेगावकर यांनी अकरा गुंठे जमिन दान देऊन ती अडचण दूर केली.
८2 लाख रुपयाची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी टाकली मात्र या आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता मंजूर झाला नाही. यामुळे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत इमारत तशीच उभी असल्याची खंत किशनराव पाटलांनी व्यक्त केली. या दानशूर जगदंबे पाटलांना सामाजिक सेवासह सामाजिक बांधीलकी म्हणून प्रवाशांना मोफत फील्टर पाणी पिण्यासाठी ऊपलब्ध करून दिले.
www.massmaharashtra.com