● ना ऑडीट,ना आहार ! कसा चालतो ग्रामिण रुग्णालयाचा चा कारभार! ● वैद्यकीय अधिक्षक आणि आहार संस्थाचालकाची मिलीभगत! ● गोर गरिब रुग्ण आहारा पासुन वंचित. ● आहार न देताच बिले उचलून लाखो रुपये हडप! ● आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडे केली तक्रार.
उमरी ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला दिल्या जाणार्या मोफत आहारात लाखो रुपयाचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीत आहार पुरवठा करणाऱ्या संस्थाचालकावर व यांना पाठीशी घालणार्या वैद्यकिय अधिक्षावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माहीती अधिकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष सोनू उर्फ साहेबराव अरविंद वाघमारे यांनी नांदेड जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या कडे केली असून कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
नांदेड जिल्हा ग्रामिण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय तर्फे मोफत आहार रुग्णाला दिला जातो. कोणता आहार कोणत्या दिवशी दिला जावा याच वेळापत्रक सुद्धा असते. मात्र याचे फलक (चार्ट ) लावले नाहीत. शासनाने किती रुपये प्रमाणे आहार दिले? कोणता आहार दिल्या जातो? याची माहिती वैद्यकीय अधिक्षकांना सांगता येत नाही. कोणत्या संस्था मार्फत हा मोफत आहार पुरवठा होतो? संस्था चालक कोण यांची माहिती होवू दिल्या जात नाही. जिल्ह्यात किती संस्था मार्फत मोफत आहार दिल्या जातो यांचा थांगपत्ता नाही. ना ऑडीट ना आहार. याचा अर्थ स्पष्ट होतो की रुग्णाच्या मोफत आहारात लाखो रुपयाचा घोटाळा आहे. संस्था चालक आणी ग्रामिण रुग्णालय वैद्यकिय अधिक्षक हे संगनमताने आहारात घोटाळा करून बिले उचलून रक्कम हडप करतात असा आरोप निवेदनात सोनू वाघमारे यांनी केला आहे .
उमरी ग्रामिण रुग्णालयात मागील दोन ते तीन महिण्या पासुन रुग्णाला आहार देण्यात आला नाही पण बिले कशी काय उचलण्यात आली? एका उमरी तालुक्यात असे गैर कारभार तर जिल्हयातील रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयात किती मोठा भष्ट्राचार आहे हे सिद्ध होत आहे. या बाबत तक्रार निवारण प्राप्त नाही. सामान्य नागरीक तक्रार करावी तर कोणाकडे चर्चा करावी तर कोणाकडे याचा खुलासा ही सोनू वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना मागितला आहे. जिल्हयात जानुन बुजून शासनाची दिशाभुल केली जात असुन त्यामुळे गोर गरिब रुग्ण सुविधे पासुन वंचित राहत आहेत. संस्था कडून लाखो रुपये लूट होत असून यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आर्थिक देवाण घेवाण करून बिले उचलण्याचा गोरख धंदा सर्रास सपाटा चालू असल्या चा अरोप करण्यात आला आहे.
या सर्व बाबीचा गांर्भीयाने विचार करून या घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबधीतां वर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाला बसु असा इशारा निवेदनाव्दारे माहीती अधिकार संरक्षण समिती चे ता.अध्यक्ष सोनू उर्फ साहेबराव अरविंद वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक अधिकरी मो. अंन्सारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्या निवेदनच्या प्रति आरोग्य मंत्री राजेश टोंपे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, आमदार राजेश पवार, तहसीलदार, वैधकीय अधिक्षक यांना दिल्या आहे .
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy