नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करा, युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांची मागणी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील 2021- 22 च्या अंतर्गत पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्र उध्वस्त करून नवीन इमारत बांधण्यात आली असून त्या इमारतीचे परिपूर्ण काम न करता गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी थातूरमातूर काम करून निकृष्ट दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम परिपूर्णत्वाकडे नेले असल्यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही परिस्थितीत दवाखान्याची इमारत उध्वस्त होऊ शकते.
युवा सेना
युवा सेना
उद्घाटनापूर्वीच स्लॅपचे पाणी थेंबा थेंबाने साचत असल्याचेही दिसत आहे. गेल्या अनेक दिवसात अनेक वर्तमान पत्रामध्ये बातम्या येऊन सुद्धा, शासनाने लाखो रुपये खर्च करून गेल्या अनेक दिवसांमध्ये इमारत नसल्याकारणाने या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा शासनाने प्रामाणिक प्रयत्न केला असता, स्थानिक वैद्यकीय अधिकारी व गुत्तेदार यांच्या मनमानी कारभाराने बांधकाम हे थातूरमातूर पद्धतीचे कल्याने भविष्यात आरोग्य केंद्रास धोका होऊ शकतो व सध्या आरोग्य केंद्र ग्रामपंचायत च्या इमारमध्ये असल्यामुळे तिथे सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत.
डॉक्टर वेळवर येत नसल्याने परिसरातील रुग्णानां नाहक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. सदरील बांधकाम करण्यात आलेल्या बांधकामाची शासकीय नियमानुसार चौकशी करून सदरील गुत्तेदारकडून इमारतीमध्ये पूर्वीप्रमाणे दवाखाना व दवाखान्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात यायाव्या असेही कुंटूरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 संबंधित गुत्तेदारावर किंवा अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांनी अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य व संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला आहे. तेव्हा येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्जे गुरुजी कंट्रक्शन वर योग्य ती कारवाई करण्यात यावी नवीन बांधकामात असलेल्या इमारतीचे इंजिनिअरच्या माध्यमातून सखोल चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावे असे कुंटूरकर यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या