ग्रामीण रुग्णालय इमारत भाडेतत्त्वावर घ्या अन्यथा कार्यकारी अभियंता सां.बां.कार्यालयास टाळे ठोकणार – साहेबराव पाटील शिंदे

[ नांदेड जि.प्रतिनीधी- आनंद सुर्यवंशी ]
उमरी तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे अनेक वर्षापासून त्या इमारत मध्ये रुग्णांचे उपचार होत होते पण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय भोकर जा.क्रं.1557 /आरेखक दिनांक 8/06/2023 यांच्या पत्राच्या अनुषंगाने शासकीय ग्रामीण रुग्णालय इमारत व निवासस्थान जीर्ण अवस्थेत असल्याने सदरील इमारत राहण्या योग्य व वापरण्या योग्य नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे उमरी शहरातील व ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात सध्या पावसाळा चालू असल्याने इमारत जीर्ण अवस्थेत असल्यामुळे स्लॅब मधून पाणी गळते भिंतीतून पाणी पाझरते रुग्णालयात पाणी साचते मोठी अडचण निर्माण झाली आहे.
गर्भवती महिला रुग्णालयात आली तर त्या रुग्णाला प्रस्तुती हाॅल नाही ही चिंताजनक आहे साधा आडवा पडदा लावून प्रस्तुती करतात आणि रुग्णालयात दुर्गंधी आहे यावरुन असे लक्षात येते की वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष आहे ह्या इमारती मध्ये डॉ.अधिकारी,महिला नर्स,कर्मचारी रुग्णांना जीव मुठीत धरून उपचार करतात पण ही इमारत पावसामध्ये कधी केंव्हा कोसळेल याची वेळ सांगून येत नसल्याने पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांनी तातडीने भाडेतत्त्वावर इमारत उपब्लध करून द्यावे, रुग्णांची गैर सोय टाळावी वरील प्रकरणात विलंब झाल्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम भोकर ह्यांची जबाबदारी निश्चित करुन यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा दिनांक 24 जुलै 2023 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयास टाळे ठोकू असे शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख तथा समन्वय समिती तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील शिंदे व शिष्टमंडळाने उमरी तहसिलदार हरीश गाढे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सुरेश पाटील ढगे युवासेना उपजिल्हा युवाधिकारी, बाबुराव पाटील भुत्ते संजय गांधी निराधार तालुकाध्यक्ष, दादाराव पाटील पुयड माजी तालुकासंघटक, अशोक पाटील जोगदंड ग्रा.पं.स.,से.स.सो.सदस्य सावरगाव कला, कैलास पाटील हातणीकर माजी तालुकासंघटक, शिवाजी पाटील हस्सेकर माजी किसान सेना तालुकाध्यक्ष, साईनाथ मुटकुटवार माजी शहरध्यक्ष, दिगांबर ईंगळे ग्रा.पं.सं.तळेगाव, राजू पांचाळ कळगाव, शिवानंद भालेराव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या