राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कार्यकर्तात उत्साहाचे वातावरण.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर केलेली निवड म्हणजे अजित पवार गटांकडून धर्माधिकारी यांना मोठं गिफ्ट दिलीपराव धर्माधिकारी जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरन निर्माण झाले असून दिलीपरावांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे
 राष्ट्रवादी पक्षाच्या फुटी नंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही गटांनी संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली असून, आपापल्या संघटना मजबूत करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील असाच प्रयत्न करण्यात आला असून, अजित पवार यांच्या गटाकडून ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांची नियुक्ती करून शरद पवार गटांला धक्का देण्यात आला आहे.
दिलीपराव धर्माधिकारी हे मूळ नायगाव तालुक्यातील बरबडा गावचे आहेत. या भागात स्व. बळवंतराव धर्माधिकारी, गोविंदराव धर्माधिकारी आणि दिलीपराव धर्माधिकारी यांचे वडील दिगंबरराव धर्माधिकारी यांचं शैक्षणिक,अध्यात्मिक यासह सामाजिक कार्य हे अतिशय उल्लेखनीय आहे.सन 1999 मध्ये राजकीय कोंडीमुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र स्थापना केली तेंव्हा स्वर्गीय दिगंबरराव धर्माधिकारी यांनी शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.त्यांच्या पश्चात दिलीपराव धर्माधिकारी यांनी मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत कारणास्तव भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु अल्पावधीतच भाजपमधील अंतर्गत गट बाजीला कंटाळून त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा घर वापसी केली.याच मोठ गिफ्ट दिलीपराव धर्माधिकारींना अजित पवार गटांकडून मिळाल असून. थेट ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची माळ आता त्यांच्या गळ्यात पडली आहे. या निवडीने मात्र 30 वर्षानंतर धर्माधिकारी कुटुंबातून दिलीपरावांच्या रूपाने बरबड्याचं एक नेतृत्व जिल्ह्याला मिळाले असून, धर्माधिकारी यांच्या निवडीने अजित पवार गटाला नांदेड जिल्ह्यासाठी एक खंबीर नेतृत्व मिळाल आहे,यामुळे पक्ष मोठ्या प्रमाणात वाढीस लागण्याची शक्यता आहे.
स्वर्गीय बळवंतराव, गोविंदराव आणि दिगंबरराव धर्माधिकारी यांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याचं काम या पंचक्रोशीत दिलीपराव धर्माधिकारी हे करीत आहेत.यांच्या या कामाची दखल घेऊन जिल्ह्याच नेतृत्व करण्यासाठी पक्षाने त्यांना संधी दिली आहे. या निवडीनंतर दिलीपराव धर्माधिकारी यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत असून,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष हितासाठी जिल्ह्यातील संघटन मजबूत करून आगामी काळात मोठ्या उमेदिने काम करण्याचा विश्वास धर्माधिकारी यांनी व्यक्त करत लवकरच अजित पवार यांचा नांदेड जिल्ह्या दौरा असणार असल्याच स्पष्ट केले आहे.
जिल्‍ह्यातील बहुतांश राष्‍ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये पक्ष फुटी नंतर अजूनही संभ्रमावस्था आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे दौरे करुन अजित पवार गटाची बांधणी आता दिलीपराव धर्माधिकारी यांना करावी लागणार आहे. पुढील काही दिवसात जिल्हा कार्यकारिणीची निवड करताना धर्माधिकारी यांचा कस लागणार हे विशेष.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या