घराच्या छतावरून पडल्याने ऋतुजा कवटीकवारचा मृत्यू.

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
शहरातील प्रसिद्ध उद्योगपती जुन्या पिढीतील व्यापारी चंद्रकांत नागेश कवटीकवार यांची नात ऋतुजा धनंजय कवटीवारची मुलगी आपल्या घराच्या चौथ्या मजल्यावर गेली असता पाय घसरून चौथ्या मजल्यावर सिमेंट रस्त्यावर खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याने दवाखान्यात ईलाज करताना मृत्यू पावली या मृत्यूमुळे नायगाव शहरासह महाविद्यालयात शोककाळा पसरली.
या घटनेची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नायगाव शहरातील प्रसिद्ध उद्योगपती जुन्या पिढीतील व्यापारी चंद्रकांत नागेश कवटीकवार यांची नात धनंजय कवटीकवार यांची मुलगी ऋतुजा वय 21 ही दिनांक 18 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता पानसरे नगरातील घरातील चौथ्या मजल्यावर गेली असता पाण्याच्या टाकी जवळ असलेले शेवाळवरून पाय घसरून चौथ्या मजल्यावरून खाली येत विद्युत तारावर पडून, तार तुटून खाली सिमेंच्या रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत नायगाव येथील शासकीय रुग्णालयात प्रथम उपचार करून नांदेड येथील खाजगी हॉस्पिटल प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर ऋतुराज यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ती मृत्यू पावली.
तिला वाचवण्यासाठी डॉक्टर ऋतुराज यांनी शर्तीचे प्रयत्न करूनही अखेर काळाने जडप घातल्याने ऋतुजा मृत्यू पावली असल्याची डॉक्टरांनी घोषणा केली. घटनेची माहिती नायगाव शहरात समजताच व्यापाऱ्यांनी अपली प्रतिष्ठान बंद करून दुखवटा व्यक्त केला. ऋतुजा कवटीकवार हीं नायगाव येथील अन्न तंत्रज्ञान विद्यालयात बी टेक सेकंड ईयर मध्ये शिक्षण घेत होती. ती हुशार व संयमी, गुणी होती. या घटनेची माहिती समजताच सुप्रसिद्ध डॉक्टर प्रतापवार, केशवराव चव्हाण हनमंतराव पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण , विजय पाटील चव्हाण , रवींद्र चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, सय्यद रहीम शेठ, भगवानराव लंगडापुरे नारायण पा जाधव, सुधाकर पा शिंदे , पांडू पाटील चव्हाण,यांच्यासह आर्य वैश्य समाज बांधव व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी उशिरा आर्य वैश्य समाज स्मशानभूमीमध्ये आप्त स्वकीय मित्र परिवार व्यापारी समाज बांधव यांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या