श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान येवती आयोजित श्री क्षेत्र द्वारकाधाम येथे श्रीमद् भागवत कथा भव्य सुरुवात !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी]
श्री श्री प.पु. सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती( लघु आळंदी) येवती जि. नांदेड आयोजित श्रीमद श्रीकृष्ण लीलामय भागवत कथा श्री क्षेत्र श्री द्वारका धाम (चारधाम पैकी एक धाम येथे श्री श्रीमद श्रीकृष्ण लीलामय भागवत कथेचे भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात झाली.
महाराष्ट्रातून व तेलंगणा व कर्नाटक येथुन कथेचे श्रवण  करण्यासाठी सातशे भाविक श्री क्षेत्र द्वारका येथे मठाधिपती श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अशा भव्य स्वरूपात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात 13 मे 2024 पासून सुरुवात झाली आहे. अनेक भक्तगण उपस्थिती होती भव्य स्वरूपात कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. वाराणसी, काशीधाम , जगन्नाथ पुरी धाम , या दोन या ठिकाणच्या श्रीमद् भागवत कथेसाठी भक्तगणांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षी श्री द्वारका धाम या ठिकाणी श्रीमद् कृष्ण लिलामय भागवत कथा करण्यात आला. या भागवत कथेसाठी कार्यक्रमासाठी प्रयत्न करणारे भक्तगण श्री बाळू महाराज जोशी येवतीकर, श्री हेंमत बेंडे, श्री विशाल चौधरी, श्री दत्तात्रय पाटील टाकळीकर, श्री राजू पाटील मोकासदरेकर, पांडुरंग पाटील टाकळीकर, महेश धुमशेटवार नांदेड, श्री नंदकुमार दाचावार सकनुर, श्री संतोष महेंद्रकर मुखेड, श्री चंद्रकांत काचमवार नरसी, श्री वेंकट सावकार पद्दमवार नांदेड, श्री संतोष मेडेवार, श्री संतोषभाई लातूर, श्री राजकुमार कोटगिरे नांदेड, कुमारी ऋतिका कोटगिरे, पत्रकार कैलास तेलंग टेंभुर्णीकर,लक्ष्मीकांत कुलकर्णी,गणेश सुडके,शेखर सुरावार इत्यादी भक्तगणांनी यात्रेसाठी प्रयत्न केले.या वेळी माजी सभापती श्री.प्रकाश पाटील बेंबरेकर, माजी.उपसरपंच श्री.मोहन पाटील भिलवंडे,श्री.शिवाजी ईगोले,श्री.गुनवंत पाटील शेळगावकर, श्री.प्रदीप पाटील कल्याण, या सह महाराष्ट्रतुन जवळपास पाचशेहून आधीक भाविक या कथेचा लाभ घेत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या