सगरोळी वाळू ठेकेदारावर बिलोलीत गुन्हा दाखल ; पत्रकारांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना !

[ प्रतिनिधी – जयवर्धन भोसीकर ]
तालुक्यातील मौ.सगरोळी येथील वाळु घाटावर अवैध उत्तखनन व वाहतुकी बाबत चौकशीसाठी महसुल पथका सोबत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना वाळु ठेकेदार अयुब मचकुरी याने गाव गुंडाना सोबत घेवुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी व मारहाण केल्याबाबत वाळु ठेकेदार अयुब मचकुरी याच्यावर सोमवारी रात्री उशीरा बिलोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेती घाटावर बेकायदेशिर चार जे.सी.बी.मशीन द्वारे अवैध रित्या दिवसरात्र रेतीचे उत्खनन होत आसल्याच्या तक्रारी होत्या तसेच प्रतिदिनी हजारो ब्रास रेतीचे उत्खनन नेमुन दिलेल्या गट क्र. ३५८ चतुःसिमे ऐवजी अन्य गटात उत्खनन होत असुन बोगस वे बिल वापरुण अवैध वाहतुक देखील होत असल्याचे असंख्य तक्रारी पुढे आल्या त्यानुसार दि. २१ सोमवार रोजी सांयकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास महसुलचे नायब तहसीलदार रघुविरसिंग चव्हान यांनी सदरील रेती घाटाचा पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी श्री मुळेकर व तलाठी यांना पाठविले होते.
वाळु घाटाच्या चौकशीसाठी महसुल पथक गेल्याची माहीती येथिल पत्रकारांना मिळाली त्यानुसार मंडळ अधीकारी व तलाठी करणार असलेल्या चौकशी पंचनाम्याचे वृंताकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना वाळु ठेकेदार अयुब मचकुरी व त्याचा जावाई या दोघांनी तुम यहां पे क्यो आये असे म्हणून पत्रकारांशी हुजत घातली व गाव गुंडांना दारु पाजवुन बेकायदेशिर मंडळी जमवुन पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व धक्काबुक्की करून मारहान केली या बाबत पत्रकार माधव एडके यांनी बिलोली पोलीस स्टेशनला येऊन या संदर्भात तक्रार दिली त्यानुसार आयुब मचकुरी व त्याचा जावई इतर गुंडावर कलम 143, 294, 323, 504, 506 आदी कलमान्वये बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिल सनगले हे करणार आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या