सगरोळी परिवर्तन पॅनलचे ग्रा.प चे ८ सदस्य करणार धरणे अंदोलन।

बिलोली – सगरोळी तालुका बिलोली येथे पोच्चमपाड येथील अतिक्रमण धारक ४०० नागरीकांचे नमुना ८ भोगवटदार अशी नोद आहे. अशा लोकांचे नमुना ८ ला मालकी नोद करा असे २०१७ साली शासनाने जि.आर काढून अतिक्रमण नियमाकुल करा असे परिपञक काढले व तसेच जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि २२/६/२०२१ जा.क्र १६६०/२०२१ रोजी पञा द्वारे ग्राम पंचायतला आदेशीत ही केले की, अशा नमुना नं ८ ची माहिती ऑनलाईन द्वारे प्रशासनास कळवा पण आद्ययावत अतिक्रमणाची माहिती पाठवण्यात आली नाही.
पण मासीक मिटीग मधे दोन वेळेस ठराव घेऊन अतिक्रमण नियमाकुल करण्या संदर्भांत ठराव ग्राम पंचायतचे लेखी पञ देऊन सदरील विषयी मार्गदर्शन जिल्हा परिषद व पंचायत समिती कडे मागण्यात आले. पण ५-६ महीन्या पासुन साधे मार्गदर्शन अथवा लेखी पञा द्वारे उत्तर देण्याच काम पंचायत समिती कडून झाले नाही. या मुळे नाईलाजास्तव सगरोळी येथील परिवर्तन पॅनलचे ग्रा.प ८ सदस्य विश्वनाथ समन, प्रभु मुत्तेपोड, शंकर महाजन, संजय पद्दमवार, महादेवी बामणे, पद्मावती सुरकुटलावार, राजाबाई गौतमवार, मेहताबी शेख यांनी आठ दिवसात अतिक्रमण धारकांचे नमुना ८ नियमाकुल न केल्यास दि २७/१२/२०२१ रोजी धरणे आंदोलन करण्याचा आक्रमक पविञा आठ सदस्यांनी घेतला आहे.
तरी आता या विषयावर जिल्हा परिषद पंचायत समिती काय निर्णय घेणार याकडे गावकर्‍यांच लक्ष लागले आहे. हा विषय तडीस निघेपर्यंत परिवर्तन पॅनलचे आंदोलन, उपोषण, मोर्चे चालुच असतील. या मुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर मार्गी काढावा असे परिवर्तन पॅनल कढून जाहिर करण्यात आले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या