शहाजी गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल सर्वत्र कौतुक !

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शहाजी गणेश मंडळाच्या वतीने जमा झालेले शिल्लक राहिलेली रक्कम साईबाबा मंदिरास अर्पण केले. अभिनव उपक्रमाबद्दल गणेश मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नायगाव शासनाने गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्याबद्दल बंदी केल्यामुळे गणेश मंडळाचा खर्च वाया न घातल्यामुळे येथील जुन्या गावातील शहाजी गणेश मंडळाची 76 हजार रुपये जमा केलेली वर्गणी डीजे, उर्वरित रक्कम विनाकारण इतरत्र खर्च होऊ नये म्हणून चांगल्या कार्याला रक्कम लागावी या उद्देशाने नायगाव शहरातील भावी भक्ताचे श्रद्धास्थान समजले जाणारे पानसरे नगर येथील साईबाबांच्या मंदिरात देणगी म्हणून चरणी अर्पण करण्यात आली.
उपक्रमाबद्दल सर्व स्थानातून गणेश मंडळाचे कौतुक होत आहे. यावेळी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, बंडू पाटील चव्हाण, सुधाकर पाटील शिंदे, रमेश पाटील शिंदे, माधव गुरुजी शिंदे, हनुमंत पाटील शिंदे  वसंत शिंदे व नगरसेवक विठ्ठल बेळगे, बंटी शिंदे, माधव शिंदे, मुन्ना शिंदे, अनिकेत जाधव, बबलू मंगरुळे, साईनाथ शिंदे व मंडळाचे सर्व उपस्थित होते गणेश भक्त उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या