दूरसंचार सल्लागार समितीच्या सल्लागार सदस्य पदी साहेबराव पाटील काळे यांची निवड

( लोहा प्रतिनिधी / दत्ता कुरवाडे )

भारत सरकारच्या दूरसंचार सल्लागार समितीच्या सल्लागार सदस्य पदी भारतीय जनता पार्टी चे सक्रिय कार्यकर्ते लोहा तालुक्यातील धावरीचे माजी सरपंच साहेबराव पाटील काळे यांची निवड करण्यात आली.
केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या भारत दूरसंचार निगम लिमिटेड ही कंपनी अत्यंत महत्त्वाची असून या दूरसंचार सल्लागार समितीच्या सल्लागार सदस्यपदी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी साहेबराव पाटील काळे यांची नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली आहे.
साहेबराव पाटील काळे हे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर आहेत त्यांचा ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे.शेतकरी , शेतमजूर, कामगार आदीचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात . तसेच भारतीय जनता पार्टीचे ते क्रियाशील सदस्य असून केंद्र सरकारच्या विविध योजना ते जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करतात . भारतीय जनता पार्टी पक्ष वाढविण्यासाठी लोहा तालुक्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे . त्यांच्या या कार्याची दखल खासदार प्रताप पाटील चिखलीकर व भारतीय जनता पक्षाने घेऊन त्यांची भारत दूरसंचार निगम लिमिटेड च्या सल्लागार सदस्यपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे स्वागत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूर मतदार संघाचे खासदार सुधाकर शृंगारे, जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, पं.स.सभापती आनंद पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, लोहा न.प.चे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, भाजपाचे लोहा तालुका अध्यक्ष तथा न .पा. उपाध्यक्ष शरद पाटील पवार,, माजी नगराध्यक्ष किरण वटमवार ,न.पा.गटनेते करीम शेख ,नगरसेवक छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, दत्ता वाले माजी पं स. सभापती शंकर पाटील ढगे, माजी उपसभापती लक्ष्मणराव पाटील बोडके , सरपंच मारुती पाटील शेलगावकर,आर्य वैश्य युथ लोहा तालुका संतोष चेऊलवार यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार मित्र आदींनी केले आहे.

ताज्या बातम्या