कुंटूर येथे रविवारी साहित्यिक कलावंतांचा लोकजागर !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
कुंटुर दि. 20 – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि पू. साने गुरूजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुउद्देशीय प्रतिष्ठान कुंटूर, साने गुरूजींची धडपडणारी मुले या युवा चळवळीच्या वतीने कुंटूर येथे रविवार, दि. 22 जानेवारी रोजी 7 वे लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध विचारवंत तथा संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाची सुरूवात स्व. गंगाधरराव कुंटूरकर प्रेरणास्थळापासून ते संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी व भाषाभगिनी दिंडीने होणार आहे. बालाजी पेठेकर व संतोष तळेगावे यांच्या चित्र व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 वाजता होणार्या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून आ. राजेश पवार, माजी आ. वसंतराव चव्हाण, डॉ. सुरेश सावंत, राजेश देशमुख कुंटूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर, विलास सिंदगीकर, शिरीष गोरठेकर, रुपेश कुंटूरकर, सूर्यकांत पा. कदम, मोहनराव पा. शिरसाट, शिवाजी पा. होळकर, सूर्याजी पा. चाडकर, बालाजीराव पवार, बाबुराव आडकिने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यातच चळवळीचे पुरस्कारही वितरीत केले जाणार आहेत. सन 2022 चे पू. साने गुरूजी सेवासन्मान दादासाहेब थेटे, प्राचार्य रेवती गव्हाणे, मनोहर सूर्यवंशी यांना तर कै. इंदूमती देशमुख व कै. शंकरराव कदम वाङ्मय पुरस्कार आप्पासाहेब खोत, नितीन भट यांना प्रदान केले जाणार आहेत.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात व्यंकटेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव काय कमावले काय गमावले ह्या विषयावरचा परिसंवाद संपन्न होईल. यात सौ. सुचिता खल्लाळ विचार मांडतील, तर तिसऱ्या सत्रात आप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कथाकथन होईल. यात डॉ. शंकर विभूते, वीरभद्र मिरेवाड हे कथा सांगतील. दुपारी साडेचार वाजता चौथ्या सत्रात कवी मनोज बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल. या कविसंमेलनाचे संचालन श्रीनिवास मस्के, अशोक कुबडे हे करतील यात केशव खटींग, प्रफुल्ल कुलकर्णी, महेश मोरे, शिवाजी आंबुलगेकर, बापू दासरी, नारायण शिंदे, शंकर वाडेवाले, दत्ता डांगे, श्रीराम गव्हाणे, पंडित पा.बेळीकर, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण मलगीलवार, सविता कुरूंदवाडे, अमृत तेलंग, शेख निजाम, पांडुरंग पुठ्ठेवाड, व्यंकटी पावडे, आत्माराम राजेगोरे, विजयकुमार चित्तरवाड, कुलदीप नंदूरकर, बालाजी तुप्पेकर, मुरारी गायकवाड, शेख जाफर, जितेंद्र देशमुख, व्यंकट सोळंके, शंकर राठोड, बालाजी पेठेकर, दिगंबर कानोले, बाबुराव विश्वकर्मा, प्रकाश गिरे, बालाजी आलगुलवाड, श.ल. नाईक, गो.रा. परडे, संजय ठिकाणे पाटील, शिवाजी जोगदंड, व्यंकट आनेराये, माधव बैलकवाड, गोविंदराव पुयड, ज्योती गायकवाड, वंदना मगाडे, दत्ता वंजे, नरेंद्र धोंगडे, पंचवटी गुंडाळे, नागोराव डोंगरे, नागोराव तिप्पलवाड, जीवन वाघमारे, सदानंद सपकाळे, राहुल मगरे, मारोती मुंडे, चंद्रकांत चव्हाण, उषाताई ठाकूर, अलका मुगटकर, सिद्धार्थ गजभारे, नितीन महादाळे, गजानन अडकिणे आदी कवी सहभागी होतील.
रात्री 8 वाजता पाचव्या सत्रात लावणीसम्राट किरण कोरे व संच यांचा बहारदार लावणी महोत्सव संपन्न होईल. तरी कुंटूर परिसरातील आणि नायगाव तालुक्यातील साहित्य रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सौ. आशाताई मारोतराव कदम, संयोजक राजेंद्र नालीकंठे, कार्यवाह विनोद झुंजारे, सहकार्यवाह मौलासाब शेख यांच्यासह राजेश आडकिने, शिवाजी आडकिने, डॉ. बाळू दुगडूमवार, मारोतराव कदम यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या