सुलतानपूर येथील माळ टेकडी साईबाबा मंदीराचे मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम संपन्न.

साईबाबा मंदीराच्या कार्यक्रमात माजी आमदार श्री.गंगाधरराव पटणे, जि.प.सदस्य श्री.लक्ष्मणराव ठक्करवाड यांची उपस्थिती !
[ बिलोली – सुनिल जेठे ] बिलोली तालुक्यातील मौजे सुलतानपूर माळ टेकडी येथील साई मंदीराचे मुर्तीप्राण प्रतिष्ठा व कलशारोहणाचे कार्यक्रम दिनांक १० फेब्रुवारी  रोजी मुखेड येथील श्री.श्री.१०८ विरूपाक्षी स्वामी महाराज यांच्या हस्ते पार पाडला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रस्तावनेत साई मंदीराची मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणा बद्दल सेवानिवृत मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर पाटील सावळीकर यांनी सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा साई मंडळाच्या वतिने शाल, श्रीफळ व पूष्पहाराने सत्कार-स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार गंगाधरराव पटने, जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, पंचायत समिती उपसभापती शंकर व्यंकम, सेवानिवृत मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील सावळीकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नागनाथ पा.सावळीकर, संग्राम हायगले, उमाकांत गोपछडे, मा.सरपंच शिवाजीराव पोरडवार, सरपंच सिध्दार्थ पतंगे, यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व पञकार उपस्थित होते.

सदरिल कार्यक्रमात शेकडो साई भक्तांनी महाप्रसाद घेतला. तर
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कै.जयराम अंबेकर शाळेचे सर्व शिक्षकवृंद्द व सुलतानपूर व अर्जापूर साईभक्त मंडळी यांनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या