सांगवी येथे साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे संपन्न 

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील मौज सांगवी येथे श्री शिर्डी साईबाबा मूर्ती प्रांत प्रतिष्ठान व प्रसारण सोहळा विविध कार्यक्रमांनी आयोजित केला आहे. नायगाव तालुक्यातील सांगवी येथील काशी विश्वनाथ साई धाम या ठिकाणी श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ३१ऑक्टोबर रोज सोमवार साडेसात वाजता होम हवन मूर्ती अभिषेक प्राणप्रतिष्ठा सोडशोपचार पूजा डॉ सत्यजित संतुकाराव वडजे व डॉ सौ शुभांगी सत्यजित वडजे याच्या हस्ते करण्यात आले. नैवेद्य तर दुपारी बारा वाजता यांचे माध्यम आरती सार्वजनिक दर्शन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे प्राचार्य पंडित रामनिवास शर्मा , कलशारोहण सोहळा येथील संत देवपुरी जी महाराज संस्थान कहाळा खुर्द या कलशारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठान करण्यात आली यावेळी माधवराव पाटील शेळगावकर, रुपेश गंगाधरराव देशमुख, कुंटूरकर, संजय पाटील शेळगावकर, सुर्याजी पा चाडकर संरपच चारवाडी, शिवाजी पा होळकर उपसरपंच कुंटूर,जगदेराव पा कदम, सुर्याकांत पा कादम, देविदास शिरसागर ,बालाजी सपाटे, डॉ सुनिल गोपाळराव पाटील कदम, राहुल पाटील निखाते, पंडित पाटील आडकीने, श्रीनिवास कदम पोलीस पाटील, व परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 डॉ विश्वनाथराव आंबाजी पाटील कदम , सौ दीपा प्रदीप पाटील लोंढे, डॉक्टर रूपा शहाजी पाटील शेळगावकर, डॉ विणा प्रवीण पाटील क्षीरसागर, व गावकरी परिवार सांगवी तालुका नायगाव च्या वतीने करण्यात आला आहे. 
या परिसरातील भाविक लोकांना गोरगरिबांना शिर्डी येथे होत नाही म्हणून मी व गावकऱ्यांच्या वतीने  काशी विश्वनाथ साई धाम सांगवी साईबाबा मंदिर प्रतिष्ठान उभारण्यात आले. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एक एकर मधे काशि विश्वनाथ साई धाम उभारणी केली आहे 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या