शंकरनगर येथे श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील नरसी ते देगलूर महामार्गावर असलेल्या शंकरनगर येथे श्री साईबाबामूर्ती प्राणप्रतिष्ठ सोहळ्याचे आयोजन माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे श्री साईबाबा शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या शंकरनगर येथे श्री साईबाबा मूर्ती प्रांतप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौ मीनलताई निरंजन खतगावकर यांच्या वतीने केले असून यानिमित्ताने दिनांक 20 मार्च बुधवार रोजी विवीध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.
पहाटे काकड आरती, मंगल स्नान, पूजाअर्चा, होमहवन, प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य दशरथ महाराज अंभोरे पंढरपूर यांचे कीर्तन सकाळी दहा ते बारा पर्यंत बारा, वाजतामहाआरती, महाप्रदाचे वाटप, करण्यात येणार तसेच असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कीर्तन सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ सौ मीनलताई निरंजन खतगावकर तसेच शंकरनगर, धुप्पा गावकऱ्यांच्या वतीने यांनी केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या