श्री साईबाबा मंदिरात दसरा निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात दसरा साईबाबा पुण्यतिथी निमित्ताने नवरात्र महोत्सव थाटात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात साईबाबा पुण्यतिथी दसरा नवरात्र निमित्ताने सात दिवस काकड आरती महाअभिषेक पूजा, मध्यानआरती, धुपारती, शेजारती , साई सच्चरित्र पोथीचे पारायण आदी सहविविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते दसरा निमित्ताने मंदिररात रंगीबेरंगी फुलाने सजवण्यात आले होते दसऱ्याच्या दिवशी महाभिषेक महाआरती करण्यात आली दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी केशवराव पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण प्रल्हाद पाटील बोंमनाळे, संजय चव्हाण ,नारायण जाधव, विठ्ठल बेळगे, श्रीनिवास शिंदे,साईनाथ चन्नावार, शरद भालेराव विजय भालेराव, पंढरी भालेराव, दत्ता मामा येवते, साई महाराज शहापुरे आदींची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या