श्री साईबाबा मंदिरात श्रीराम नवमी उत्सव सोहळा !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील शिर्डी साईबाबा प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील श्री साईबाबा मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्ताने दिनांक 11 गुरुवार एप्रिल ते 17 एप्रिल बुधवार पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
                           शिर्डी साईबाबा प्रतिरूप समजले जाणाऱ्या श्री साईबाबा मंदिर पानसरे नगर येथील श्री राम नवमी निमित्ताने दिनांक 11 एप्रिल गुरुवार 17 एप्रिल बुधवार पर्यंत श्री साई सच्चरित्र पारायण व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून पहाटे सव्वा पाच वाजता श्री काकड आरती, सकाळी पावणे सहा वाजता मंगल स्नान व दर्शन, सहा वाजता श्री साई सच्चरित्र पारायणाची सुरुवात वाचक ह भ प श्री गणेश महाराज मुसमाडे शिर्डी यांच्या सुश्राव्यवानेतून, सकाळी नऊ वाजता नैवेद्य आरती , दुपारी बारा वाजता श्री चे माध्यम आरती, संध्याकाळी चार ते सहा साईकथा ह भ प गणेश महाराज मुसमाडे शिर्डी, सायंकाळी सहा वाजता धूपआरती, रात्री आठ वाजता शेजार आरती तर मुख्य रामनवमीच्या दिवशी बुधवारी 17 एप्रिल रोजी पहाटे सव्वा पाच वाजता श्रीची काकड आरती पावणे सहा वाजता मंगल स्नान दर्शन सहा वाजता वाचक ह भ प श्री गणेश महाराज मुसमाडे शिर्डी सकाळी नऊ वाजता श्री चे नैवेद्य आरती सकाळी नऊ ते बारा राम जन्म कथा दुपारी बारा वाजता, साडे बारा वाजता मध्यान आरती, दुपारी एक वाजता श्री चा महाप्रसाद दुपारी सव्वा एक वाजता प्रसिद्ध स्वरगंगा संगीत संच गणेश हाके यांच्या कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता धूप आरती व संध्याकाळी नऊ वाजता शेजार आरती  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नायगाव तालुक्यासह शहरातील सर्व भाविकांनी श्रीराम नवमी उत्सव सोहळयात सहभागी होऊन कार्यक्रमास शोभा वाढवावी अशी विनंती साईबाबा मंदिर प्रशासन व गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या