नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील पानसरे नगरातील शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या सर्व धर्म समभावाचे प्रतीक समजले जाणाऱ्या श्री साईबाबांच्या मूर्ती स्थापनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी सुरू आहे.
नायगांव शहरातील पानसरे नगर येथील शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या भक्ताच्या नवसाला पावणाऱ्या सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबा मंदिरात श्री साईबाबा मुर्ती स्थापना व कलशारोहण सोहळाचा दहावा वर्धापन दिन मि मार्गशीर्ष कृ १२ शके १९४६ शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होणार असून पाहटे 5 ते 6 श्रींची काकड आरती,6 अष्ठोत्तर कलश महापुजा,8 वाजता नैवेद्य आरती, दुपारी 12 वाजता श्रींची मध्यान्ह आरती,व तिर्थप्रसाद,4 वाजता पुष्प अर्चन सोहळा सायंकाळी 6 वाजता श्रींची धुपारती व दिपोत्सव,8 :15 वाजता श्रीची शेजआरती, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने मंदिरात विविध फुलाने सुशोभित करण्यात आले असून मंदिरावर भव्य दिव्य विद्युत करण्यात येणार असून श्री साईबाबा मूर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे जय्यत तयारी साईबाबा मंदिर व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळ नायगांव बाजारच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या