साईबाबा मंदीरात महाशिवरात्र निमित्त रूद्रअभिषेक संपन्न !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने महादेवाचा रूद्रअभिषेक पूजा महाआरती प्रसाद वेद मंत्रोच्चारात शेकडो महिलांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला महाशिवरात्र निमित्ताने महादेवाच्या मंदिरात सर्वत्र अभिषेक पूजा दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केले होती.

याच धरतीवर नायगावचे शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी प्रदोष काळात भव्य दिव्य मंडपात महादेवाचा रुद्रअभिषेक पूजा विधीवत वेदमंत्राचार करण्यात आले यावेळी रुद्र महाभिषेकाच्या पूजेसाठी शेकडो महिलानी पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी होत्या.

यावेळी मंदिराची पुजारी साईनाथ महाराज यांनी शिव महापुरान व शिवलीलामृत ग्रंथातील दुसऱ्या अध्याय महाशिवरात्रीच्या दिवशी हरीनी व पारधी यांची सविस्तर माहिती महत्व पटवून सांगितल्यानंतर महादेवाचे महाआरती करणे करण्यात आले यावेळी महाप्रसाद घेण्यासाठी शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या