साईबाबा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी !

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
साईबाबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नायगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या प्रति शिर्डी स्वरूप समजले जाणाऱ्या साईबाबा मंदिरात साईबाबांच्या 104 व्या पुण्यतिथी दिन व दसरा निमित्ताने साईबाबांचे मंगलस्नान पूजा आरती महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण देविदास पा बोंमनाळे, विनोद सावकार गंदेवार, प्रल्हाद पा बोंमनाळे, नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण पा जाधव दत्ता मामा येवते, विजय पाटील जाधव, माणिक चव्हाण, पांडू पा चव्हाण, संजय चव्हाण, गजानन चौधरी, कोंनकेवाड, अतुल चालीकवार, हाके सर, यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यावेळी साईबाबा मंदिर ची पुजारी साई महाराज यांनी साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने बाबांच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या