गुढीपाडव्यानिमित्त साईबाबा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील पानसरे नगरातील प्रति शिर्डी स्वरूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या श्रीसाईबाबा मंदिरात गुढीपाडव्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या सबका मालिक एक शिर्डी साईबाबा पानसरे नगरातील साई मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्ताने पहाटे काकड आरती ,मंगलस्नान, दुपारी महाआरती , धुपारतीआरती, शेजारआरती करण्यात आली.

यासह नायगाव येथील नगरपंचायतीच्या वतीने मंदिर परिसरामध्ये साई उद्यान मुलांच्या खेळण्यासाठी तयार करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, हनमंतराव पाटील चव्हाण, संजय अप्पा बेळगे,श्रीनिवास पाटील चव्हाण, रवींद्र पाटील चव्हाण, केशवराव पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण श्रीनिवास जवादवार, गजानन चौधरी , सचिन चिद्रावार, साईनाथ वट्टमवार, बालाजी येरावार, दत्ता मामा येवते, साई महाराज शहापूरकर, यांच्यासह भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या