शिर्डी ला जाणारी साई बाबांची पाई पालखी दि.०५ रोजी बिलोलीत दाखल होणार – मंदीर समिती कडून शंकर मावलगे यांचे साई भंक्तांना आवाहन !

● बिलोली येथील श्री.साईबाबा मंदिर च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन.●

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
तेलंगाना व महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत बिलोली येथील श्री.साईबाबा मंदीर येथे दर वर्षीप्रमाणे या ही वर्षी भाविक व भक्त महिला भगींनी, नागरिक श्रध्देने व मोठ्या संख्येने १३ डिसेंबर रोजी शिर्डी ला साई बाबांची निघालेली पाई पालखी  दि.५ जानेवारी २०२३ रोजी बिलोलीत दाखल झाल्यावर जुना बस स्टाॕप जवळील हणुमान मंदिर च्या ठिकाणी थांबेल व सर्व साई भक्तांनी साईमंदीराकडे जायचे आहे. असे मंदिर समितीकडून शंकर मावलगे यांनी साई भक्तांना आवाहन केले.

साईबाबा वर भक्तांची श्रध्दा असल्यामुळे अनेक भक्तांना त्यांचे मनोकामना पुर्ण होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्या भक्तापैकि प्रा.गोंविद बैलके यांनी ही गुरुवार चे औचित्य साधून बांबाची पुजा अर्चना करुन महाप्रसादाचे आयोजन केले असता साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात विविध दुकाने थाटलेले पाहून साई भक्त या दुकानावर वस्तू खरेदी करतांना दिसुन आले. या प्रमाणे दर गुरुवारी बिलोलीत सांई भक्तांची वारी असते.
 बिलोली येथे येत्या दि.५ जानेवारी सकाळी साई बांबा मंदीर या ठिकाणी भाविक भक्तांनी यायचे आहे, असे मंदीराच्या वतीने सुभाष पवार, किरण देशमुख, शंकर मावलगे, अर्जून पवार, यांच्या सह.पदाधिकारी यांनी आवाहन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या