साईबाबाचे मंदिरात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केली महाआरती !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नायगाव येथील पानसरे नगर मधील श्री साईबाबा मंदिरामध्ये दीपावलीच्या निमित्याने दीपोत्सव व महाआरतीच्या आयोजन करण्यात आले होते.

येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति शिर्डी स्वरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील साई मंदिरामध्ये दीपावलीच्या निमित्याने सायंकाळी दीपोत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आली होती. महाआरती जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, बाळासाहेब पाटील खतगावकर, केशवराव पाटील चव्हाण, हनमंतराव पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण, सुधाकरराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, संजय आप्पा बेळगे, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, रवींद्र पाटील चव्हाण, राजू गंदीगुडे, शेटकर, गजानन चौधरी आदीजण उपस्थित होते.

सोबतच माधवराव कंधारे, विनोद सावकार गंदेवार , नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण जाधव, पांडू पाटील चव्हाण, साईनाथ मेडेवार, सतीश लोकमनवार, माणिक चव्हाण, संजय चव्हाण, पवन गादेवार, हाके सर, विठ्ठल बेळगे, निवास शिंदे, मंदिराची पुजारी साई महाराज, यांच्यासह साई भक्त महिला पुरुष बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो दीप लावल्यामुळे साई मंदिर उजळून निघाले होते. 

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या