केरूर येथे 27 व 28 एप्रिल रोजी श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळयाचे आयोजन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामूळे सर्व कुंभार समाज बांधव संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी आपल्या घरातच साजरे करीत होते,परंतु यावर्षी कोरोना चे सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्व बिलोली तालुक्यातील कुंभार समाज बांधवांनी संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे.
याच अनुषंगाने केरुर येथे दिनांक 27 एप्रिल रोजी बुधवारी रात्री आठ वाजता ह भ प श्री श्रीधर महाराज कासराळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व दिनांक 28 एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता ह भ प श्री राम किशन महाराज कोलमकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दर वर्षी बिलोली तालुक्यातील केरूर, कासराळी, बिलोली, कुंडलवाडी, पिंपळगाव, सगरोळी, आदमपूर, लोहगांव, तळणी व लघुळ येथे मोठ्या उत्साहात संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
यावर्षी सुद्धा सर्व कुंभार समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पुण्यतिथी साजरी करावे असे आवाहन स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री शंकर कुरणापल्ले केरुरकर, तालुका अध्यक्ष श्री साईनाथ शिरोळे, तालुका सचिव गंगाधर मरकंटे, युवा अध्यक्ष सुरेश मेहेत्रे, श्री गंगाधर कानगुलवार, श्री सायलु कानगुलवार, श्री सायलू पाशावार, श्री मरकंटे सर, श्री हणमंत कानगुलवार, श्री बालाजी पाशावार, श्री साहेबराव मिर्झापूरे, श्री विठ्ठल राजुरे, श्री संजय मेहेत्रे, श्री हणमंत मिरदोडे, श्री सायलू कुरणापल्ले व शिवाजी कानगुलवार यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या