गुरु रविदास जयंती मंडळाची कार्यकारीणी जाहीर !

● ( २६ फेब्रुवारी रोजी जयंती सोहळ्याचे आयोजन ) 

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
    गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती मंडळ , नरसी कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी येथील जेष्ठ पत्रकार गंगाधर गंगासागरे यांची सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. क्रांतीकारी महामानव विज्ञानवादी विचारवंत जगतगुरु गुरु रविदास महाराज यांची ६२५ वी जयंती गुरु रविदास मंदीर प्रेरणा केंद्र , नरसी (ता.नायगांव ) जि. नांदेड या स्थळावर दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ (रविवार) या दिवसी साजरी करण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने काल दिनांक ७ जानेवारी रोजी (शनिवारी ) येथील समाजबांधवांची महत्वपुर्ण बैठक जमनाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येवून पुढीलप्रमाणे कार्यकारीणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी गंगाधर गंगासागरे (पत्रकार), सचिव माधव गंगासागरे, कोषाध्यक्ष हाणमंत गंगासागरे , उपाध्यक्ष आनंदा बरबडे, धोंडीबा कांबळे , सहसचिव संतोष कांबळे, कार्याध्यक्ष व्यंकट गंगासागरे, अशोक गंगासागरे, संघटक बालाजी बरबडे, सुरेश कांबळे, शैलेश गंगासागरे, सदस्य बाबूराव गंगासागरे, रोहीत गंगासागरे यांची निवड जाहीर केली . 
या बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक दिगांबर गंगासागरे, गंगाराम गंगासागरे, जमनाजी कांबळे, आनंदा गंगासागरे , गिरजाजी गंगासागरे यांसह गजानन गंगासागरे, अजय कांबळे, शंकर बरबडे, त्रषीकेश बरबडे, अविनाश कांबळे, प्रमोद कांबळे, पांडुरंग गंगासागरे, साईनाथ गंगासागरे, सुरेश कांबळे आदींची उपस्थीती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या