श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीदिनी अभिवादन

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जगद्गुरु संत तुकोबा महाराज यांच्या गाथेचं पारायण होते जागर होतो ती महानगाथा जिवंत करणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीदिनी नायगाव शहरातील मुख्य चौकात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे परिवर्तनवादी अभंग इथल्या सनातनी वर्गांना मान्य नव्हते म्हणून ती गाथा पाण्यात बुडवली गेली. ती गाथा नष्ट झाल्याने संत तुकाराम महाराज यांनी अन्न पाणी सोडले होते. तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी त्यांचे सावलीप्रमाणे राहणारे शिष्य श्री संत जगनाडे महाराज यांनी ती गाथा अवघ्या काही दिवसात स्व हाताने लिहून जिवंत केली अशा या महान संताना त्यांच्या जयंती दिनी नायगाव येथे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष रामकिसन पालनवार यांच्या नेतृत्वाखाली समाज व विविध कार्यकर्ता सामाजिक संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्यांना उजाळा देण्यात आला.
यावेळी देविदास पा.बोमनाळे मा.नगर सेवक, गजानन चव्हाण नगर सेवक प्रतिनिधी, रामकिशन पालनवार म.प्रा.तेली समाज जिल्हाध्यक्ष , व्यंकट येरसनवार, म.प्रा. तेली समाज जिल्हा सचिव शंकर पाटील कल्याण भाजपा शहराध्यक्ष, डॉ राजेश मिरकुटे, हनुमंत मिरकुटे सरपंच प्रतिनिधी, प्रकाश येरसनवार, श्रीधर कोलमवार, गजानन कोलमवार, राधाकिशन चौधरी, कोळगे साहेब पोलीस कॉन्स्टेबल, पवन सावकार गादेवार, रामकिशन चौधरी, बालाजी चौधरी, यासह अदीजनाची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या