कंधार येथे संत सेवालाल महाराज यांची २९३ वी सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी !

[ कंधार – भास्कर कदम ]
बंजारा समाजाचे दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची कंधार येथील सार्वजनिक जयंती निमित्त, जयंती मंडळाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण यांच्या पुढाकारातून व सहकाऱ्यांसह विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीचे औचित्य साधून दिनांक १८ फेब्रुवारी रोजी वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती कंधार येथे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, रक्तदान शिबीराचे उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार संघाचे कंधार तालुका अध्यक्ष, योगेंद्रसिंह ठाकुर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. व रक्तदानास सुरुवात करण्यात आली. त्यात १५६ रकतदात्यांनी रक्तदान केले.

 दिनांक २६ रोज शनिवार रोजी शिवरामजी पवार मंगल कार्यालय कंधार येथे बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषेत महीलांनी व नवतरुणींनी सहभाग घेऊन सेवालाल महाराजांचा गजर करत जयंती उत्सव जलहोशात साजरा केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड, व मार्गदर्शक म्हणून माजी आमदार किशनराव राठोड, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. संजय पवार, व प्रमुख अतिथी (बंजारा क्रांती दल अध्यक्ष) देविदासजी राठोड, प्रमुख पाहुणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या भाषणानंतर शेवटी बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत श्री. क्षेत्र पोहरागड येथील बाबुसिंग महाराज पोहरादेवीकर यांनी प्रवचनातून जमलेल्या बंजारा समाजाला मंत्रमुग्ध केले व प्रवचनानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला व जयंती सांगता झाली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या