कुंडलवाडीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी साजरी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          येथील शिंपी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दिनांक 25 जुलै रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .सर्वप्रथम सकाळी विठ्ठल रूखमाई सहित संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे अभिषेक व पूजन करण्यात आले.
त्यानंतर दुपारी कुंडलवाडी भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेवटी समाजाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम ही संपन्न झाला.
यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष रुकमाजी यन्नावार, गणपत संगेवार , लक्ष्मीकांत येपूरवार, गजानन येपूरवार, शंकर तुंगेनवार, अनिल येपूरवार, सुभाष दरबस्तेवार, दिलीप तुंगेणवार, गोपाळ येपूरवार, रुद्रंगीवार यांच्यासह कुंडलवाडी शहरातील सर्व शिंपी समाजातील बंधू भगिनी व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या