मांजरम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील मांजरम येथील जय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दि .१३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी हनुमान मंदीरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी प्रथम श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गादीपाटावार प्रतिमा ठेवून पुष्प सजावट करुन दिप प्रज्वलन पुजन करण्यात आले.
दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी जय गुरुदेव सेवा मंडळाचे ग्राम अधिकारी साहेबराव पाटील जाधव यांच्या कडून महाराजांना अभिप्रेत असलेले प्रतिमेची सजावट केली या प्रसंगी सामुदायिक प्रार्थना घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगितेतून संदेश दिला त्यावर प्रबोधन घेण्यात आले व महाराजांनी लिखित केलेली भजन मालेचे गायन करण्यात आले यावेळी जयगुरुदेव सेवा मंडळाचे ग्राम अधिकारी साहेबराव पाटील जाधव , विनायकराव पाटील शिंदे , अनंतराव पाटील मंगनाळे , विकास भुरे , शिवाजीराव पाटील शिंदे , बाबुराव पाटील शिंदे , गायकवाड पाटील , विलास पाटील शिंदे , उत्कृष्ट गायन केले तर तबल्याची साथ शुभम माली पाटील , शाहीर बालाजी राव पाटील शिंदे यांनी दिली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य बालाजी राव माली पाटील , मारोतराव पाटील शिंदे , प्रकाश पाटील शिंदे , दत्ता पाटील गायकवाड , शिवाजी पाटील, राजेश वाकरडे आदी मंडळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिखीत केलेली राष्ट्र प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व सर्व उपस्थित मंडळींना प्रसाद वाटप करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या