संत तुकाराम महाराज बीज नायगांवात शिवानंद पांचाळ यांनी केली साजरी !

(नायगांव बाजार दि.२० मार्च)
शहरातील भगवान पशुपतीनाथ मंदिरात संत तुकाराम महाराज बीज शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी छोटेखानी बीज साजरी केली आहे. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी जिवण पाटील चव्हाण नायगांवकर, सचिन फुलारी, गंगाधर स्वामी. शेळगाव चे मा.पाटील आदी भक्त गण उपस्थित राहून मोठ्या भक्तिभावाने पुजन करून वंदन केले. संत तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस संत तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदा २० मार्च रोजी तुकाराम बीज साजरी झाली आहे.
या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात.फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला देहु गावात झाला. पंढरपूरचे परमेश्वर विठ्ठल माऊली हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरु ‘ म्हणून ओळखतात.
जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी रचले आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या