सुजलेगालच्या युवा शेतकऱ्याचा शेती माल थेट जिल्हास्तरावर विक्री.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नांदेड भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकऱ्यांने रानभाजी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
        नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकऱ्यांनी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नांदेड, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष,व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने रानभाजी महोत्सव २०२२, निमित्त नायगाव तालुक्यातील सूजलेगाव येथील शेतकऱ्यांचा शेतमाल उत्पादनाचे थेट विक्री निमित्ताने युवा शेतकरी सुभाष भिमराव सज्जन यांचा ७/१२ फुड्स उद्योग सुजलेगाव उत्पादित उत्पादनाचे विक्री करताना ग्राहक व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.डॉ. विपीन इटनकर साहेब (IAS) यांनी त्यांच्या ७/१२ फुड्स उत्पादित पदार्थांचे खरेदी करताना व सुभाष भिमराव सज्जन यांना मार्गदर्शन केले.
सोबत आर.बी.चलवदे , (जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, नांदेड), अति.जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , विधानपरिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या सह त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या