सकल मराठा समाजाचे आरक्षणासाठी आ.हंबर्डे व आ.कल्याणकर यांच्या घरासमोर घेराव आंदोलन

( लोहा / प्रतिनिधी दत्ता कुरवाडे )

नांदेड दिनांक 21/9/2020
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात ठीक ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलने होत असून ,मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह आदी मागण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे वनांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या घरासमोर त्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना शासनाच्यावतीने एसईबीसी चे आरक्षण शिक्षणात व नौकरीत होते परंतु विरोधकाने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यातील लाखो मराठा युवकावर शिक्षणावर व नोकरीवर स्थगिती आली त्यामुळे राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कम पुढे मांडावी व तसेच मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढावा राज्यातील नोकर भरती मराठा आरक्षणाचा निकाल लागेल पर्यंत बंद करावी आदी मागण्यांचा समावेश होता.
यावेळी विजय उर्फ पप्पु चव्हाण,बाळासाहेब जाधव, सुभाष कोल्हे,पवन लोंढे,माऊली पवार, बालाजी जाधव, योगेश कदम, भानुदास पवार,श्याम पवार, लक्ष्मण मोरे, श्रीकांत पवार यांच्यासहित सर्व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या