सालेगाव सेवा सहकारी सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात ; मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने संपूर्ण संचालक मंडळाचे स्वागत !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
धर्माबाद तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी सालेगाव येथील सेवा सहकारी सोसायटी ही बिनविरोध काढण्यात आली.
सदरील सेवा सहकारी सोसायटी निवडणूक प्रसंगी काँग्रेसचे नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन ही सोसायटी बिनविरोध काढली.
यावेळी चेअरमपदी बालासाहेब दिगंबर उमरे तर व्हॉईस चेअरमन पदी सूर्यकांत बापूराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, संचालक म्हणून विठ्ठल पुंजाजी शिंदे, विनायक देविदास शिंदे, बालाजी वामनराव जगदंबे, देवराव गणेशराव कुंभार गावे, पंडित शिवाजी नरवाडे, चंद्रभागा गंगाधर कवती, साखरबाई धोंडजी गोरठकर, मारोती लिंगा दासेवाड, लाचेराम गंगा उसकीलवाड, विठ्ठल लक्ष्मण गायकवाड आदीची निवड बिनविरोध करण्यात आली.
या सर्व संचालक मंडळाचे स्वागत काँग्रेसचे नेते कवळे गुरुजी यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले.
यावेळी पांडू पाटील शिंदे, अवधूत पाटील भुतावळे, श्रीनिवास पाटील भुतावळे, सोपान देविदास उमरे, व्यंकटराव भुतावळे, चंद्रकांत उमरे, अंबादास भुतावळे, बालाजी कवते, अर्जुन जगदंबे, गोविंदराव ढाले, आदी जन उपस्थित होते.निवडणूक प्रशासनाकडून चुणूकवाड यांनी काम पाहिले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या