हैद्राबाद येथे दिगांबरराव गायकवाड यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी – मानवी हक्क अभियानाचे नांदेड जिल्हाध्यक्ष दिगांबरराव पोचीराम गायकवाड यांनी केलेल्या विविध राज्यातील समाजिक कार्याची दखल घेऊन तेलंगणा राज्याच्या वतीने हैद्राबाद येथे त्यांना प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह, रोख रक्कम देवून समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
             रविवारी दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी रविंद्र भारती एससी हाँल हैद्राबाद येथे जीसीएस वेलूरी फाउंडेशनच्या वतीने व्ही. आर. श्रीनिवास राजू, बी. सी. कमिशनचे चेअरमन श्रीओकला बरनम माजी मंत्री राजेशम गौड, महिला प्रतिनिधी व्हीना कुमारी, जेस्टिका मलकजगिरी मधुसुदनराव अनेक आमदार व खासदार,मानवी हक्क अभियान मचिंद्र गवाले मराठवाडा प्रमुख,दिगांबर विभुते,संगमित्र गवळे संगिता गरबडे,यांच्या उपस्थितीत दिगांबरराव पोचीराम गायकवाड नागठाणेकर यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
            त्यांनी मानवी हक्क अभियानाचे क्रांतीसुर्य एकनाथरावजी आव्हाड (जिजा) यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून जमिन अधिकार आंदोलन करून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, अशा अनेक राज्यात जावून भूमिहीन लोकांचा लढा तिव्र करून हजारो लोकांना सरकारी जमिनी मिळवून दिले तसेच दलीत अत्याचार महिला अत्याचार बाल कामगार इत्यादी मानवी हक्कांचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी लढवया कार्यकर्ता म्हणून काम केले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून दिगांबरराव पोचीराम गायकवाड यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केल्या बदल तेलंगणा राज्याचे महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या