संभाजी कांबळे सेवानिवृत्त !

[ कुंडलवाडी –  अमरनाथ कांबळे ]

         येथील मिलिंद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले संभाजी नागोराव कांबळे हे वयोमानानुसार 34 वर्ष प्रदीर्घ अशी आपली सेवापूर्ण करून दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. ते 1987 ला मिलिंद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून रुजू झाले होते.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले असल्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने हि सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या या सेवानिवृत्ती बद्दल गट शिक्षणधिकारी दिगंबरराव तोटरे, संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, मुख्याध्यापक हवगीरराव गोपछडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखरराव पाटील सावळीकर, मुख्याध्यापक यु एस राठोड, एच टी राऊत, सौ एम एस खंदारे,एच एन पांचाळ, व्ही एस देगावकर,बी एम गंगोने,एल आर तेलगाणे, सी ए कुंडलवाडीकर, एस एन आंबेराय, एल एस मांजरे, एस डी चंदनकर, ए ए दगडे, विजय लोहगावकर, हरिदास मुंडे, अरुण वाळवे, वंदना कांबळे,आदींनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
www.massmaharashtra.com 
      युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून 

ताज्या बातम्या