सामाजिक बांधिलकीचे विश्वस्त समीर भाऊ बनकर !

(लेखन प्रा.महंमद शेख सर )

म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय समीर बनकर यांचा आज वाढदिवस. समीर भाऊ, आपला वाढदिवस आम्हा सर्वांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आणि सण..
काही गाव आणि नाव मनात कायम घर करून राहतात. म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष समीरजी बनकर सामाजिक बांधिलकीचे विश्वस्त अनेकांना परिचित आहेत.
वडील विनोद बनकर आणि आजोबा स्वातंत्र सेनानी गणपत गोविंद बनकर यांच्या सामाजिक संस्कारातून प्रेरित होऊन समीर बनकर समाजाप्रती आपली सामाजिक बांधीलकी व सामीलकी जोपासून समाजातील प्रत्येक घटकाशी आपले पणाने सुसंवाद साधत आहेत समीर बनकर यांचे आजोबा स्वातंत्र सेनानी गणपत गोविंद बनकर यांनी स्वातंत्र लढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा झाली.
त्या वेळी समीर बनकर चे वडील विनोद बनकर हे लहान होते. स्वातंत्र सेनानी पेन्शन नाकारून आपले देशप्रेम अधोरेखित केले. समीर बनकर यांनी म्हसळा ग्रामस्थ मंडळ आणि तांबट सोनार आळी येथून आपल्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आणि संस्काराने भारावलेले समीर बनकर यांनी आपले समाज कारण, राजकारण करताना अनेकाना दिलासा आणि विश्वास देण्यांत सतर्कता दाखवली आहे.
       www.massmaharashtra.com
शिवसेनेच्या विविध संघटनात्मक पदावर कामकरत असताना म्हसळा तालुक्यातशिवसेनेला व्यापक जनाधार मिळवून देण्यांत समीर बनकर सातत्याने कार्यरत राहिले. श्री बनकर यांना म्हसळा हिंदू समाज संघटना अध्यक्ष सुभाष करडे, माजी आमदार शामभाई सावंत, विजय सावंत, रमेश विचारे, जनार्धन बुधे यांची मोलाची साथ लाभल्यामुळे समीर बनकर एक अभ्यासू संयमी आणि कुशल संघटक म्हणून म्हसळा तालुक्यात परिचित आहेत.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे समीर बनकर यांनी शिवसेने पासून फारकत घेतली.
समीर बनकर यांचे नेतृत्व, वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व अनेकांना आपलेसे वाटू लागले आहे. म्हसळा तालुक्याचा चालत बोलता माहितीपट आपल्या स्मृतीपटलावर कोरणारे बनकर यांना खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन समीर बनकर यांना राजकारण,समाजकारणात सक्रिय केले.
पंचायत समिती,ज़िल्हा परिषद,विधानसभा,म्हसळा नगरपंचायत निवडणूकित समीर बनकर यांनी अफाट जनसंपर्क,अचूक निर्णय क्षमता आणि राजकीय परिपक्वता यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळून दिले.
खासदार सुनील तटकरे, विधी व न्याय, पर्यटन राज्य मंत्री तथा रायगड ज़िल्हा पालक मंत्री कु. आदितीताई तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांची साथ व प्रेरणा समीर बनकर यांची राजकीय ऊर्जा आहे.
समाजकारण, राजकारण, शिक्षण कला -क्रीडा सांस्कृतिक व धार्मिक उस्तव -विविध उपक्रमा मध्ये बनकर सक्रिय आहेत. त्या मुळे समीर बनकर यांची उपस्थति अनेकांना प्रेरणादायक वाटत असते समीर बनकर यांचे विविधी संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला समीर बनकर आपले विश्वस्त वाटू लागले आहेत. अधिकाऱ्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करून जनतेच्या प्रश्नांना सरकार दरबारी वाचा फोडण्याचा काम समीर बनकर करत आहेत.
अनेक अधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांना प्रशासकीय कामकाजाची जवळून ओळख आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयचे चेरमन म्हणून कार्यरत आहेत. विद्यालयची प्रगतीसाठी स्थानिक स्कुल कमिटी पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ, पालक, हितचिंतक आणि विद्यार्थी यांच्या शी समन्वय साधत विद्यालयाची सर्वागिन प्रगती उंचावत आहे.
समाज कारणातून राजकारणात कसे यशस्वी व्हावें याचे मुर्तीमंत प्रतिक समीर बनकर आहेत त्याचे  विषयानुकूल विचार मांडण्याचे कसब अजब आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या सौ. अर्चना वहिनी यांची खंबीर साथ आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने समीरभाऊ बनकर यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. ️

ताज्या बातम्या