समृद्धी महामार्ग निझामाबाद ला जोडा- आमदार शामसुंदर शिंदे !

आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कापसी येथे २ कोटी ८४ लक्ष रुपये कामाच्या पुलाचे भूमिपूजन.

[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठाण ]
लोहा तालुक्यातील कापसी बु येथे काल रविवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते नाबार्ड योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 2 कोटी 84 लक्ष रुपयाच्या नूतन पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, युवा नेते विक्रांत शिंदे, रोहित पाटील शिंदे, सरपंच भास्कर पाटील ढगे, कापसी चे सरपंच प्रतिनिधी शिवाजी आळणे, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, माजी सरपंच राजू पाटील वडवळे, चेअरमन गोविंदराव जहागीरदार प्रमुख उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार शिंदे म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची कामधेनू कलंबर सहकारी कारखाना सुरू करणार असून मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून जोपर्यंत शेतकरी नगदी पिके घेणार नाहीत तो पर्यंत त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार नसल्याने या भागात साखर कारखान्याची आवश्यकता असून या कलंबर कारखान्यामुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकांना योग्य वेळी मार्केट मिळण्यासाठी नांदेड हून जाणारा समृद्धी महामार्ग निजामबाद पर्यंत जोडण्यासाठी मी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले, हा समृद्धी महामार्ग निजामबाद पर्यंत झाल्यास नांदेड जिल्ह्याचे भाग्य उजळणार असून सर्व देशाशी नांदेड चा संबंध येणार आहे…
मतदारसंघातील मंजूर झालेल्या सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी चे नियोजन करण्यात येत असून हे सिंचन प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जातील, मतदारसंघातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले, या पूर्वी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून कापसी बु येथे 23 लक्ष रुपयाची अंतर्गत विकास कामे झाली असून नूतन 20 लक्ष रुपयांची कामे मंजूर झाली आहेत, या नवीन पुलाच्या कामाच्या मंजुरीसाठी व निधीसाठी आमदार शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर विशेष प्रयत्न करून आपल्या या पुलाला मंजुरी व 2 कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे, हा पूल झाल्यामुळे या भागातील दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. यावेळी आमदार शिंदे यांनी कापसी बुद्रुक येथील दत्त मंदिर परिसरात सभामंडपा साठी दहा लक्ष रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे, यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ,युवानेते विक्रांत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गोविंदराव पाटील चिंचोलीकर ,गोपीराज हंबर्डे, पंजाब माळेगावे, हनुमंत पाटील डोनवाडेकर, आदिनाथ पाटील शिंदे, सुनील भदरगे, संतोष पाटील पिंपळदरीकर, पप्पू भुरे, भगवान घोडके, विजय जाधव, शाम गिरी महाराज, श्याम सावळे, सचिन कुदळकर,हणमंत जाधव,विजय जाधव, नागोराव कापसे, दतराम पाटील वडवळे,सुनील मोरे सह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या